साकळी येथील जैन मंदिरात आले कासव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST2021-09-13T04:17:11+5:302021-09-13T04:17:11+5:30
साकळी येथे श्री १००८ श्री आदिनाथ भगवानजींचे प्रसिध्द मंदिर आहे. या मंदिराला जवळपास ९२ वर्षे पूर्ण होत ...

साकळी येथील जैन मंदिरात आले कासव
साकळी येथे श्री १००८ श्री आदिनाथ भगवानजींचे प्रसिध्द मंदिर आहे. या मंदिराला जवळपास ९२ वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या मंदिरात जैनधर्मीय महत्त्वाचे पर्युषण पर्व साजरे केले जात आहे. दरम्यान या पर्वाच्या उत्सवात श्रीमती मंदाकिनी यशवंतलाल जैन (साकळी) यांनी श्री १००८ मुनीसुव्रतनाथ भगवान यांची प्रतिमा भेटस्वरूप दिली. याप्रतिमेची मंदिरात दिवसभर विधिवत पूजा-अर्चा झाली. दुसऱ्या दिवशीही १२ रोजी मुनीसुव्रतनाथ भगवान यांची प्रतिमा समोर ठेवलेलीच होती आणि याच दिवशी जेव्हा सकाळीच प्रमोद गोकुळदास जैन हे मंदिरात दर्शनार्थ गेले असता त्यांना मंदिराच्या द्वारापाशी एक छोटे कासव आढळून आले. श्रीमुनीसुव्रतनाथ भगवान यांचे कासव हे चिन्ह आहे हे विशेष.