मोटारसायकल अपघातात तरडेचा युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 15:58 IST2019-06-14T15:58:16+5:302019-06-14T15:58:36+5:30
वडील जखमी : जांभोरे शिवारात अज्ञात वाहनाने मारला कट

मोटारसायकल अपघातात तरडेचा युवक ठार
धरणगाव- तालुक्यातील जांभोरे शिवारात पारोळ्याकडून धरणगावकडे मोटारसायकलवर येणाऱ्या पिता-पुत्रांना अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे झालेल्या अपघातात तरडे ता.पारोळा येथील यूवक ठार झाला तर त्याचे पिता जखमी झाल्याची घटना १२ रोजी घडली.
या अपघातात मृत पावलेला गुलाब जोरसिंग चव्हाण (वय ३५) हा मुंबई महापालिकेत सेवेत कार्यरत होता. त्याला पदोन्नतीसाठी इंजिनियर व्हायचे असल्याने त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी तो वडिल जोरसिंग महारु चव्हाण यांच्या सोबत १२ रोजी दुपारी मोटारसायकल क्र.एम.एच.१९/सीएम.८९३० ने धरणगावकडे येत असतांना जांभोरे शिवारातील गोटू काबरा यांच्या शेताजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना कट मारल्याने त्यांची मोटारसायकल झाडावर आदळली. त्या दोघांना तातडीने विकी खोकरे यांनी अॅम्बूलन्सने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता सदर युवकाला डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
डॉक्टरांनी शवविच्छेदन करुन रात्री ८ वाजता शव ताब्यात दिले.मयत युवक गुलाब याच्या पश्चात आई-वडिल,पत्नी ,एक मुलगी असा परिवार आहे. या घटने संदर्भात जोरसिंग चव्हाण यांनी दिलेल्या फियार्दीवरुन पोहेकॉ थोरात यांनी पंचनामा करुन भादवि ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ४२७, १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.