रेशन दुकानातून तूर डाळ गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:31+5:302021-02-05T06:00:31+5:30
जळगाव : गोरगरिबांना आधार असलेल्या स्वस्त धान्य दुकानावर सध्या तूर डाळ उपलब्ध होत नसल्याने शिधापत्रिकाधारक डाळीपासून वंचित राहत असल्याचे ...

रेशन दुकानातून तूर डाळ गायब
जळगाव : गोरगरिबांना आधार असलेल्या स्वस्त धान्य दुकानावर सध्या तूर डाळ उपलब्ध होत नसल्याने शिधापत्रिकाधारक डाळीपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. शिधापत्रिकांसाठी नियमित डाळीचा पुरवठा होत नसून ही डाळ कधी येते तर कधी येत नाही. सध्या स्वस्त धान्य दुकानावर नियमित धान्य मिळत आहे. एकीकडे डाळ येत नाही तर अनेक स्थलांतरित व मयतांचे नावे कमी करणे सुरू असल्याने अनेक जण स्वस्त धान्यापासून वंचित आहे.
शिधापत्रिकाधारकांना नियमित स्वस्त धान्य मिळावे, यासाठी जिल्ह्यातील जे शिधापत्रिकाधारक स्थलांतरित झाले आहे, मयत झाले आहेत, अशांची नावे वगळण्यात येणार आहे. जेवढी नावे कमी होतील, तेवढे लाभार्थी वाढणार आहेत. तसेच मुलींचे लग्न होऊन सासरी गेल्या आहे व इतर कारणांमुळे जे स्थलांतरित झाले आहेत, अशा व्यक्तींची नावेदेखील वगळण्यात येणार आहेत. यासाठी तालुकास्तरावर सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
डाळ मिळेना
एकीकडे सर्वांना धान्य मिळावे, यासाठी नावे कमी केली जात आहे. मात्र आता दुकानातून तूर डाळ गायब झाली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी पुरवठा करण्यात येण्याऱ्या धान्यामध्ये तूर डाळ नियमित येत नाही. तीन महिने ही डाळ आली व आता पुन्हा येणे बंद झाले आहे. त्यामुळे गरजूंना किराणा दुकानातून ही डाळ घ्यावी लागत आहे. सध्या तूर डाळ १०० ते १०५ रुपये प्रति किलोवर पोहचली असून त्याचा भुर्दंड शिधापत्रिकाधारकांना सहन करावा लागत आहे.
धान्यासह साखरही वाटप
स्वस्त धान्य दुकानावर दर महिन्याला देण्यात येणाऱ्या नियमित धान्यासह अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका धारकांना साखरचे वाटप केले जात आहे. नियमित धान्यामध्ये गहू, तांदूळ, मका व साखर वाटप केली जात आहे. कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रति सदस्य तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले गेले. तसेच यंदा स्वस्त धान्य दुकानावर तेल मात्र आले नसल्याचे चित्र आहे.
- एकूण शिधापत्रिका धारक - १०,००६१३
- अंत्योदय योजना - १,३३,४०८
- प्राधान्य कुटुंब योजना - ४,७६,८२८
- जिल्ह्यात धान्याची मागणी (मेट्रिक टन) - १४५००
जिल्ह्यात सध्या शिधापत्रिका धारकांना नियमित धान्य दिले जात आहे. तूरडाळ मात्र उपलब्ध होत नसल्याने डाळ दिली जात नाही. शिधापत्रिका धारकांना गहू, तांदूळ, साखर, मका वाटप केले जात आहे.