शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

साकेगाव येथील वाघूर नदीच्या पुलावर अडकला ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 3:23 PM

साकेगाव राष्ट्रीय महामार्गावर वाघूर नदीच्या पुलाचे संरक्षण कठडे तोडत ट्रक चक्क अर्ध्यावर लटकला.

ठळक मुद्देजीवित हानी टळलीमोठी दुर्घटना टळली ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्ययवाहनांच्या लांब रांगा

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव राष्ट्रीय महामार्गावर वाघूर नदीच्या पुलाचे संरक्षण कठडे तोडत ट्रक चक्क अर्ध्यावर लटकला. सुदैवाने यात जीवितहानी टळली. ही घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली.राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याचा साकेगावजवळ वळण देऊन थेट वाघूर नदीवर मार्ग जोडण्यात आला आहे. सकाळी ढगाळ वातावरण अंधूक सूर्यप्रकाश व साखर झोपेमुळे ट्रकचालकाचा गाडीवरून ताबा सुटला. ट्रक क्रमांक जीजे-१५-एटी-०९६८ चक्क वाघूर नदीच्या संरक्षण कठड्यस फिल्म स्टाईल धडक देत सुमारे ५० फूट उंचीवरील पुलाचे जवळपास दहा कठडे तोडत ट्रक अर्धा पुलावर व व अर्धा खाली अशा पद्धतीने अडकला. चालकाने प्रसंगावधान राखत लगेच ट्रकमधून उडी घेत घटनास्थळावरून पसार झाला. सिनेस्टाईल झालेल्या घटनेमुळे अवजड ट्रक असूनसुद्धा मोठी दुर्घटना टळली. कोणतीही जीवित हानी झाली नाही. यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ असा प्रत्यय याठिकाणी आला.अन्यथा मोठा अपघात घडला असतासुदैवाने ट्रक कठड्यावर अडकला. दुर्दैवाने जर ट्रक वाघूर पात्रात पडला असता तर आधीच महामार्गावरून ५० फूट खोल व त्यातच महामार्ग कामासाठी नवीन पूल बांधणीसाठी पात्राच्या खाली आणखीन १० फूट खोल खड्डे करण्यात आले आहेत. त्याच्यात २० फुटांपर्यंतचे धारदार सळईचे फाउंडेशन तयार करण्यात आले आहे. नेमका त्याच ठिकाणी ट्रक अडकला होता. चुकून जर खाली पडला असता तर फाऊंडेशनच्या सळया संपूर्ण ट्रकमध्ये घुसल्या असत्या व ट्रकचे नट बोल्टही दिसले नसते. अशी घटना घडण्याची शक्यता होती.वाहनांच्या लांब रांगा, वाहतूक ठप्पदरम्यान, पहाटे घडलेल्या या घटनेमुळे वाघूर नदी पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या जवळपास तीन तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.महामार्ग पोलिसांनी केली वाहतूक सुरळीतमहामार्ग पोलीस एएसआय गुलाब मनोरे, हे.कॉ.युसुफ शेख, पो.ना.मिलिंद सोनवणे यांनी घटनास्थळी धाव देत सर्वप्रथम घटनास्थळावरून अपघातग्रस्त ट्रकला बाजूला केले. यानंतर आधी जळगावकडे जाणारी वाहतूक सोडली व काही वेळानंतर वाहतूक पूर्णत: सुरळीत झाली.बघ्यांची गर्दीवाघूर पुलावर ट्रक अडकल्याची वार्ता गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठत अडकलेला ट्रक पाण्यासाठी गर्दी केली होती.

टॅग्स :AccidentअपघातBhusawalभुसावळ