Truck motorcycle collides face-to-face in landslide | भुसावळात ट्रक मोटारसायकलची समोरासमोर धडक
भुसावळात ट्रक मोटारसायकलची समोरासमोर धडक

ठळक मुद्देएकाचा मृत्यूदुसरा गंभीर

भुसावळ, जि.जळगाव : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गॅस एजन्सी समोर ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात हर्षल संतोष सपकाळे (वय ३०, श्रीनगर, भुसावळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर झाला आहे. ही घटना २२ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गॅस एजन्सीसमोर नाहाटा कॉलेजकडून जळगावकडे जात असलेला ट्रक (क्रमांक एमएच-१९-झेड-९६३९) आणि जळगावकडून शहरात येणारी विना नंबरची मोटारसायकल यांची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार हर्षल संतोष सपकाळे (वय ३०, रा. श्रीनगर, भुसावळ) याचा जागीच मृत्यू झाला, तर चेतन भरत चौधरी (वय २७, रा.श्रीनगर) हा गंभीर जखमी झाला. चौधरी यास येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती समजताच डीवायएसपी गजानन राठोड यांच्यासह बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच माजी नगरसेवक दीपक धांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक पिंटू ठाकूर, दुर्गेश ठाकूर, सतीश सपकाळे यांच्यासह नागरिकांनी महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या अपघातमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूूक शाखेचे एपीआय के. टी. सुरळकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, ट्रकचालक ललित कोळी (रा. नेरी नाका, जळगाव) यास ट्रकसह बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: Truck motorcycle collides face-to-face in landslide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.