पास असल्यावरही ट्रकचालकाला पोलिसाची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 12:54 IST2020-04-23T12:54:03+5:302020-04-23T12:54:33+5:30
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय गोदामात धान्य घेऊन आलेल्या रवींद्र ओंकार विसपुते (रा.अमळनेर) ट्रक चालकाला जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला ...

पास असल्यावरही ट्रकचालकाला पोलिसाची मारहाण
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय गोदामात धान्य घेऊन आलेल्या रवींद्र ओंकार विसपुते (रा.अमळनेर) ट्रक चालकाला जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या शिवाजी पवार या हवालदाराने बुधवारी सकाळी दंडूक्याने बेदम मारहाण केली. त्यात रवींद्र याचा हात फ्रॅक्चर झालेला आहे. कारागृहाजवळ गर्दी जमलेली होती. यावेळी धान्य खाली करायला आलेले रवींद्र हा पाणी प्यायला गेला असता शिवाजी पवार यांनी त्याला दंडूक्याने मारहाण केली. धान्य घेऊन आलो असून पास आहे असे सांगितल्यानंतरही पवार यांनी या तरुणाला मारहाण केली. प्रकरण अंगाशी येण्याचा अंदाज येताच पवार यांनी स्वखर्चाने या तरुणावर उपचार केले. त्यानंतर पळताना जमिनीवर कोसळलो असा जबाब या तरुणाकडून लिहून घेत नंतर त्याला अमळनेर येथे स्वत:च सोडून दिले.