पंचकजवळ दुचाकी उभ्या ट्रकवर आदळल्याने एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 17:36 IST2018-12-19T17:34:02+5:302018-12-19T17:36:25+5:30
पंचक गावाजवळ उभ्या ट्रकला अडावदकडे जाणाऱ्या दुचाकीची धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

पंचकजवळ दुचाकी उभ्या ट्रकवर आदळल्याने एक जण ठार
बिडगाव, ता.चोपडा : पंचक गावाजवळ उभ्या ट्रकला अडावदकडे जाणाऱ्या दुचाकीची धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. अधिक माहिती अशी अडावद येथील सुनील उर्फ रावसाहेब उत्तमराव सोनवणे (पाटील) जळगावहून दुचाकी क्र. एम.एच.१९ डी.सी.९००७ ने अडावदकडे येत असतांना रात्री नऊच्या सुमारास पंचक गावाजवळ उभी ट्रक क्र.एम.एच.१८ जी.२५५७ या गाडीला जोरदार धडक बसून अपघात झाला. यात आॅटो स्पेअरपार्ट दुकान चालक सुनील सोनवणे (पाटील) हे जागीच ठार झाले. माहिती अडावद पोलिसांना कळताच गरबड सोनवणे, राजेंद्र इंगळे यांनी धाव घेत प्रेत शवविच्छेदनासाठी चोपडा येथे रवाना केले. घटनास्थळी एपीआय. राहुलकुमार पाटील उपनिरिक्षक गजानन राठोड यांनी धाव घेऊन पाहणी केली. मयत सुनील सोनवणे हे विजय पाटील यांचे बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.