जळगावमध्ये दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 02:06 PM2019-10-19T14:06:09+5:302019-10-19T14:08:07+5:30

ळगावमध्ये दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे.

truck and bike accident in banbhori near jalgaon | जळगावमध्ये दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले

जळगावमध्ये दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले

Next

जळगाव - जळगावमध्ये दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीत पेट्रोल भरुन घराकडे परतताना साईटपट्टीवरुन दुचाकी महामार्गावर चढविण्याच्या प्रयत्नात तोल जावून महार्गावर पडल्याने मागून आलेल्या ट्रकने धर्मेंद्र मिथलेश बरहार (मूळ रा. उथरगाव, उत्तरप्रदेश) या तरुणाला ट्रकने चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वाजता बांभोरी महाविद्यालयाजवळ घडली. अपघातानंतर ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद हा शनिवारी सकाळी दुचाकीत (क्र. एम.एच.१९.बी.वाय.८५२१) पेट्रोल भरण्यासाठी घराबाहेर पडला. बांभोरी गावापासून काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर त्याने दुचाकीत पेट्रोल भरले. यानंतर पुन्हा बांभोरीकडे निघाला. यावेळी खोल साईडपट्टीवरुन दुचाकी महामार्गावर चढविण्याच्या प्रयत्नात तो तोल जावून महामार्गावर पडला. यावेळी पाळधीकडे जाणाऱ्या ट्रकने ( क्र.डब्लू.बी. १७,४३३५) त्याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात झाला तेव्हा विधानसभा निवडणुकीसाठी स्थीर सर्व्हेक्षण पथक विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराची पाहणी करीत होते. या पथकातील पोलीस कर्मचारी नारसिंग पाडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. बांभोरी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर धर्मेंद्रची ओळख पटली. जैन इरिगेशनच्या रुग्णवाहिकेने मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिसांनी ट्रकसह ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. मूळ उत्तरप्रदेश राज्यातील उथरगाव जि. जालोन येथे धर्मेंद्र आई, वडील व भाऊ या परिवारासह वास्तव्यास होता. 
 

Web Title: truck and bike accident in banbhori near jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.