जळगाव येथे महामार्गावर टाईल्स घेऊन जाणारा ट्राला उलटला, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 12:16 IST2018-03-09T13:17:04+5:302018-03-10T12:16:32+5:30
टाईल्स अस्ताव्यस्त

जळगाव येथे महामार्गावर टाईल्स घेऊन जाणारा ट्राला उलटला, दोघे जखमी
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ९ - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर जळगाव येथे टाईल्स घेऊन जाणा-या ट्रालाला बसने हुलकावनी दिल्याने हा ट्राला उलटून झालेल्या अपघातात चालक व क्लिनर जखमी झाले. हा अपघात ९ मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास गोदावरी महाविद्यालाच्या समोर घडला.
गुजरात मधून नागपूरकडे टाईल्स घेऊन जाणारा ट्राला जळगाव शहरापासून पुढे निघाल्यानंतर समोरून येणाºया बसने त्यास हुलकावनी दिली. यात ट्राला चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्राला रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटला. यामध्ये चालक व क्लिनर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. हा ट्राला झाडावर उलटल्याने ते झाड जमीनदोस्त झाले. अपघातात ट्रालामधील टाईल्स अस्ताव्यस्त पसरली.