पहूरला देशभक्तीच्या गीतांव्दारे शहिदांना श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:14+5:302021-08-13T04:20:14+5:30
कोरोनाचे नियम पाळून छोटेखानी कार्यक्रम आर. टी. लेले विद्यालयात मंगळवारी रात्री घेण्यात आला. गोदाई बहुउद्देशीय संस्था गेल्या २२ ...

पहूरला देशभक्तीच्या गीतांव्दारे शहिदांना श्रध्दांजली
कोरोनाचे नियम पाळून छोटेखानी कार्यक्रम आर. टी. लेले विद्यालयात मंगळवारी रात्री घेण्यात आला.
गोदाई बहुउद्देशीय संस्था गेल्या २२ वर्षांपासून क्रांतिदिनाच्या निमित्ताने शहिदांना देशभक्ती गीतांव्दारे सुरेल संगीतातून श्रध्दांजली कार्यक्रम घेत आहेत. यंदा ही गोदाई बहुउद्देशीय संस्था व लेले विद्यालय यांच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.
विशेष म्हणजे स्थानिक कलावंतासह नवोदित कलावंतांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ संधी ठरल्याने ग्रामीण भागातील कलावंतांच्या गायिकेला दाद मिळत आहे. यामुळे कलावंतांना वेगळी ओळख निर्माण केली आहे. शुभारंभ प्रभारी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले. यावेळी आरोग्यदूत अरविंद देशमुख, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज समिती प्रमुख रामेश्वर पाटील, लेले विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील, उपसरपंच कसबे राजू जाधव, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, दिग्दर्शक कैलास माळी, किरण भास्कर पाटील, गोदाई संस्थेचे अध्यक्ष कैलास चव्हाण, प्रवीण कुमावत, चेतन रोकडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यात महेबूब पेंटर, शरीफ पेंटर, अनिल देशमुख, शांताराम लाठे, समाधान हिवाळे, किरण भास्कर पाटील, मुकेश वानखेडे या स्थानिक कलावंतांनी देशभक्तीच्या गीतांव्दारे शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली.
120821\12jal_6_12082021_12.jpg
लेले विद्यालयात आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ करताना किरण शिंदे, अरंविद देशमुख, आर. बी. पाटील आदी.