शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भावांजली कार्यक्रमाद्वारे महात्मा गांधी यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

जळगाव : वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जाणे रे... दे दि हमे आझादी बिना खडग बिना ...

जळगाव : वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जाणे रे... दे दि हमे आझादी बिना खडग बिना ढाल, अशा गीतांनी शनिवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘भावांजली’ कार्यक्रमाद्वारे गांधींच्या कार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी गांधीजींची अंतिम झलक आणि विश्वातील प्रसिद्ध व्यक्तींनी महात्माजींना दिलेली श्रद्धांजली अशी हिंदी व इंग्रजीची ‘द लास्ट जर्नी’ डॉक्युमेंटरीचे सहा शोदेखील दाखविण्यात आले.

महात्मा गांधी उद्यानात झालेल्या ‘भावांजली’ या कार्यक्रमाचे उद्घाटन शरद डोंगरे यांच्या हस्ते महात्मा गांधी प्रतिमा पूजनाने झाले. यावेळी उदय महाजन, मनोहर बागूल, विजय मोहरीर, अनिल जोशी, नितीन चोपडा, बी.डी. पाटील उपस्थित होते. यानंतर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पीजी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जाणे रे... दे दि हमे आझादी बिना खडग बिना ढाल, असे एकाहून एक अजरामर भजन सादर केले. गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त ‘महात्मा को नमन’ प्रदर्शनात महात्मा गांधीजींच्या अंतिम यात्रेच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित अधिकृत संदर्भ असलेले गांधी रिसर्च फाउंडेशनचे विशेष चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन उद्यानाच्या वेळात नागरिकांना पुढील तीन दिवस विनामूल्य पाहता येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विन झाला यांनी केले.

इन्फो :

जैन इरिगेशनतर्फे श्रद्धांजली

गांधी रिसर्च फाउंडेशन गांधी तीर्थ आणि जैन इरिगेशनच्या वतीने महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ११ वाजता व सायंकाळी सव्वापाच वाजता महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जैन इरिगेशनच्या भारतातील सर्व आस्थापनांमध्ये एकाच वेळी हे कार्यक्रम घेण्यात आले. सकाळच्या श्रद्धांजलीच्या वेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहकारी उपस्थित होते.