शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

कारावासाची शिक्षा सुनावताच आरोपीचा न्यायालयात धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:32 PM

दालनाचा दरवाजा व बाकड्यांना मारल्या लाथा

जळगाव : न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावताच मनोजसिंग सिंकदरसिंग टाक (२७, रा. मलकापूर, जि,बुलडाणा) या आरोपीने न्यायाधीशाच्या दालनात धिंगाणा आरडाओरड केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी न्या. ज्योती दरेकर यांच्या दालनात घडला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याने दालनाच्या दरवाजाला तसेच बाहेरील बाकडे व खुर्च्यांना लाथा मारल्या.दरम्यान, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी स्वत: पकडून आरोपीला बाहेर काढले. तेव्हाही तो संताप व्यक्त करीत होता. माझे लहान मुले आहेत, त्यांनी आत्महत्या करायची का? असेही तो म्हणाला.चाळीसगाव येथ हिरापूर रोडवरील आदर्श नगरात दगडू दौलत देवरे (६२) व पत्नी जिजाबाई (६०) हे दाम्पत्य वास्तव्यात होते. १ मार्च २०१७ च्या मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी देवरे दाम्पत्यास बेदम मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने तसेच रोकड चोरून नेली. जबर मारहाणीमुळे देवरे दाम्पत्याचा मृत्यू झाला होता.या खटल्यात गुरुवारी न्या.दरेकर यांनी आरोपी मनोजसिंग टाक याला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तर त्याचा साथीदार सागररसिंग सिंकदरसिंग बावरी (रा.जालना) याची निर्दोष मुक्तता केली. निकाल वाचत असतानाच मनोज याने प्रचंड आरडाओरड करुन गोंधळ घालायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून न्यायाधीशांनी तातडीने अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्याशी संपर्क साधून बंदोबस्त मागवून घेतला.या गोंधळानंतर न्या. दरेकर यांनी समोर आलेल्या साक्षी व पुराव्यावरुन हा निकाल दिला आहे. तुला मान्य नसेल तर वरिष्ठ न्यायालयात जावू शकतो. कायद्याने तसे अधिकार तुला दिलेले आहेत अशा भाषेत आरोपीची समजूत घातली.या प्रकारामुळे खबरदारी म्हणून न्या.दरेकर यांनी पोलिसांना दालनाचे दरवाजे बंद करण्याच्या सूचना केल्या. सरकारी वकील शिला गोडंबे यांनाही दालनातच थांबवून घेण्यात आले. बाहेर आल्यानंतरही आरोपीने शिवीगाळ करुन गोंधळ घातला. गुन्हा घडल्यापासून मनोजसिंग हा कारागृहातच होता. त्याच्याविरुध्द १३ गुन्हे दाखल आहेत. मारहाण आणि खून प्रकरणी मुलगा नितीन देवरे यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला कलम ४५९ ,तसेच ४६०,३४ प्रमाणे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी निरीक्षक आदिनाथ बुधवंत तसेच पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनीदोषारोपपत्र सादर केले.१४ साक्षीदारांची तपासणीन्या.ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. गुन्हा सिध्द करण्यासाठी सहायक सरकारी वकील शिला गोडंबे यांनी प्रभावी युक्तीवाद करुन सरकार पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासले. त्यात मुळ फिर्यादी, तहसीलदार कैलास देवरे, पंच डॉ. निलेश देवराज, डॉ.बी.पी.बाविस्कर यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. कलम ४५९ अन्वये मनोजसिंग टाक याला दहा वर्ष सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम ४६० अन्वये दहा वर्ष सश्रम कारावास एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली.महिनाभरात चौथी शिक्षासहायक जिल्हा सरकारी वकिल शिला गोडंबे यांनी महिनाभराच्या कालावधीत चार वेळा शिक्षा घेतल्या. याआधी विनयभंगाच्या दोन गुन्ह्यात सश्रम कारावास, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या गुन्ह्यात दहा वर्ष व गुरुवारी चोरीच्या घटनेत दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणात दहा वर्ष शिक्षा घेतली.

टॅग्स :Jalgaonजळगाव