शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अंबर्षी टेकडीवर झाडे पुन्हा जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 7:24 PM

अमळनेर , जि.जळगाव : शहराच्या सौंदर्यात भर घालणारी व पर्यावरण संवर्धनाचा आदर्श नमुना असलेल्या अंबर्षी टेकडीवर पुन्हा एकदा झाडे ...

ठळक मुद्देवारंवार होणाऱ्या विध्वंसक कृत्यामुळे पाणी शुद्धीकरण व घनकचरा प्रकल्पालाही धोका१५० मीटरपर्यंत आग पसरली होती

अमळनेर, जि.जळगाव : शहराच्या सौंदर्यात भर घालणारी व पर्यावरण संवर्धनाचा आदर्श नमुना असलेल्या अंबर्षी टेकडीवर पुन्हा एकदा झाडे जाळण्याचा विध्वंसक प्रकार २० रोजी पहाटे घडला. गेल्या काही दिवसात चौथ्यांदा हा प्रकार घडल्याने निसर्गप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.आतापर्यंत चार वेळा झालेल्या प्रकारात वेगवेगळ्या ठिकाणी या आगी लावण्यात आल्या आहेत. सायकलचे टायर जाळून हा प्रकार केल्याचे टेकडीवर मॉर्निंग वॉक व व्यायाम करणाऱ्यांच्या निदर्शनास आले. पहाटे पहाटे हा प्रकार केला असल्याने सकाळपर्यंत आगीची धग सुरू होती. टेकडी ग्रुपच्या सदस्यांनी पालिकेला तत्काळ कळवून अग्निशामक बंब मागवला. कर्मचारी नितीन खैरनार, दिनेश बिºहाडे, फारुख शेख, आनंदा धनगर आदींनी आग विझवली.सुमारे १५० मीटरपर्यंत आग पसरली होती. यावेळेस लागलेल्या आगीचे प्रमाण जास्त होते. प्रांताधिकारी सीमा आहिरे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक दररोज सकाळी टेकडीवर येत असतात. तरी विघातक कृत्य केले जात असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान, टेकडीवरच अमळनेर शहराचा पाणी शुद्धीकरण व पुरवठा प्रकल्प आणि दुसºया बाजूला घनकचरा प्रकल्प आहे. विध्वंसक प्रकार वाढल्याने भविष्यातील अनर्थ घडू नये म्हणून सीसी टीव्ही कॅमेरे बसवन्याची मागणी अंबर्षी टेकडी ग्रुपने केली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर