परभणी येथील लग्नाचे व-हाड घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स बस जळगावजवळ पेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:15 IST2018-05-09T22:58:35+5:302018-05-10T00:15:53+5:30
मध्य प्रदेशातील खरगोन येथून लग्न सोहळा आटोपून परभणी येथे परत जात असलेल्या ट्रॅव्हल्स बसने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी सात वाजता तालुक्यातील विटनेर गावाजवळ घडली. चालक व प्रवाशांचे प्रसंगावधान म्हणून बसमधील ४५ प्रवाशी या दुर्घटनेतून बचावले आहे. अग्निशमन दलाच्या तीन बंबाद्वारे आग विझविण्यात आली.

परभणी येथील लग्नाचे व-हाड घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स बस जळगावजवळ पेटली
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,९ : मध्य प्रदेशातील खरगोन येथून लग्न सोहळा आटोपून परभणी येथे परत जात असलेल्या ट्रॅव्हल्स बसने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी सात वाजता तालुक्यातील विटनेर गावाजवळ घडली. चालक व प्रवाशांचे प्रसंगावधान म्हणून बसमधील ४५ प्रवाशी या दुर्घटनेतून बचावले आहे. अग्निशमन दलाच्या तीन बंबाद्वारे आग विझविण्यात आली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, परभणी येथील जयस्वाल परिवाराचे खरगोन (मध्य प्रदेश) येथे लग्न होते. त्यासाठी त्यांनी नांदेड येथील लॉर्ड व्यंकटेश्वरा ही प्रवाशी वाहतूक करणारी खासगी ट्रॅव्हल्स बस (एम.एच.११ टी.९७७७) भाड्याने लावलेली होती. बुधवारचे लग्न आटोपल्यानंतर खरगोन येथून व-हाड घेऊन ही बस परभणी येथे जात असताना जळगाव तालुक्यातील विटनेर गाव सोडल्यानंतर बॅटरीत अचानक शॉर्ट सर्कीट झाला. त्यामुळे बसने पेट घेतला.
काही प्रवाशांना काही तरी जळाल्याची जाणीव झाल्याने त्यांनी चालक यांना सांगितले. त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ बस थांबविली. तातडीने प्रवाशांना सामानासह उतरविण्यात आले. शेजारी असलेल्या ढाब्यावरील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग मोठी असल्याने जामनेर नगर पालिका, जळगाव मनपा व जैन कंपनी असे तीन बंब मागविण्यात आले. या बंबाद्वारे आग विझविण्यात आली.