मुंबईकडून येणाऱ्या गाड्या सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:39 IST2019-07-29T12:38:54+5:302019-07-29T12:39:59+5:30

जळगाव : मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे शनिवारी अप आणि डाऊन मार्गावरच्या गाड्यांचा पूर्णत : खोळंबा झाला होता. पंरतु, रविवारी ...

Trains coming from Mumbai are smooth | मुंबईकडून येणाऱ्या गाड्या सुरळीत

मुंबईकडून येणाऱ्या गाड्या सुरळीत

जळगाव : मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे शनिवारी अप आणि डाऊन मार्गावरच्या गाड्यांचा पूर्णत : खोळंबा झाला होता. पंरतु, रविवारी पावसाचा जोर ओसरल्यामुळे मुंबईकडून येणाºया सर्व गाड्या सुरुळीत सुरु होत्या तर जळगावहून मुंबईकडे जाणाºया गाड्या मात्र तीन ते पाच तास विलंबाने धावल्या. यामुळे मुंबईकडे जाणाºया प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
पावसामुळे शनिवारी सकाळच्या सत्रातील जळगावहून मुंबईकडे जाणाºया काशी एक्सप्रेस, कामायानी एक्सप्रेस, रत्नागिरी एक्सप्रेस, गितांजली एक्सप्रेस या गाड्या चार ते पाच विलंबाने धावत होत्या. यामुळे प्रवाशांना स्टेशनवर ताटकळत बसावे लागले होते. सकाळची भुसावळ-मुंबई पॅसेंजर नाशिकपर्यंतच गेली होती. रविवारी मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली होती.
जळगावहून मुंबईकडे जाणाºया काशी एक्सप्रेस, कामायानी एक्सप्रेस, रत्नागिरी एक्सप्रेस आणि कुशीनगर एक्सप्रेस या गाड्या ३ ते ५ तासांनी विलंबाने धावत होत्या. शनिवार प्रमाणे रविवारीदेखील अपच्या गाड्या विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांना

Web Title: Trains coming from Mumbai are smooth

टॅग्स :Jalgaonजळगाव