मालगाडीचा एक डबा रेल्वे रुळावरुन घसरला..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:21 IST2020-04-17T17:21:28+5:302020-04-17T17:21:34+5:30
काही वेळाने झाली वाहतूक सुरळीत

मालगाडीचा एक डबा रेल्वे रुळावरुन घसरला..
भुसावळ : गिट्टीने भरलेला मालगाडीचा एक डबा येथे घसरल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊवाजेच्या दरम्यान घडली.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीओबीवाईएन ४१ बोगीचे ड्रायव्हर आर. के. मीना व गार्ड देवेंद्रसिंग हे खडी घेऊन खंडवा भुसावळ रेल्वे यार्डात नवीन गुड्स शेड प्लॅटफॉर्म जवळ येत असताना ही घटना घडली. यावेळी एकमेकांना जोडलेल्या रुळाच्या ठिकाणी गाडीचा रूळ बदलविताना एक डबा घसरला. सुदैवाने रुळावरून घसरलेला डब्बा पूर्णपणे पलटी न होता रुळाच्या खालीच घसरल्याने मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ येथून उपमुख्य यार्ड प्रबंधक एस. ए. जोशी, रेल्वे सुरक्षा बलाचे यार्ड निरीक्षक दयानंद यादव, एएसआय के. एन. मिश्रा, हेड कॉन्स्टेबल के. पी. कोळी, कॉन्स्टेबल युसुफ तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणारी अत्याधुनिक हायड्रोलिक जॅकच्या सहाय्याने युद्धपातळीवर काम करून हा डबा रेल्वेवे रुळावर आणला. त्यानंतर काही तासानंतर ही वाहतूक सुरळीत झाली. घटनेच्या ठिकाणी रेल्वेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्या तरी खंडवा ते भुसावळ येणाऱ्या व जाणाºया मालगाड्यावर याचा काही परिणाम झाला नाही.