शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

जळगाव जिल्ह्यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून गावठी पिस्तुलची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 9:06 PM

मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या दोन राज्यातून गावठी पिस्तुलची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. पोलिसांनी पाच वर्षात गुन्हेगारांकडून ६४ पिस्तुल व १२१ राऊंड पकडले आहेत. त्यात ५७ गुन्हे दाखल करुन ११३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. यात सर्वाधिक पिस्तुल हे स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहेत.पोलिसांच्या रेकॉर्डवरील ही आकडेवारी असली प्रत्यक्षात पिस्तुलचा हा आकडा यापेक्षाही जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे गावठी पिस्तुलचे मायाजल  पाच वर्षात ६४ पिस्तुल व १२१ राऊंड पकडले११३ गुन्हेगारांना अटक

सुनील पाटीललोकमत आॅनलाईनजळगाव दि,३ : मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या दोन राज्यातून गावठी पिस्तुलची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. पोलिसांनी पाच वर्षात गुन्हेगारांकडून ६४ पिस्तुल व १२१ राऊंड पकडले आहेत. त्यात ५७ गुन्हे दाखल करुन ११३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. यात सर्वाधिक पिस्तुल हे स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहेत.पोलिसांच्या रेकॉर्डवरील ही आकडेवारी असली प्रत्यक्षात पिस्तुलचा हा आकडा यापेक्षाही जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोलिसांनी पकडलेले हे सर्व पिस्तुल दरोडा, घरफोडी व रस्ता लुट प्रकरणातील रेकॉर्डवर असलेल्या आरोपींकडेच आढळून आले आहेत.घटना घडल्यानंतर किंवा घटनेच्या आधीही हे पिस्तुल पकडण्यात आलेले आहेत. २०१५ व २०१६ या दोन वर्षात सर्वाधिक ४० पिस्तुल पोलिसांनी पकडले आहेत. हे सर्व पिस्तुल मध्यप्रदेशातील उमर्टी या खेडेगावातून आलेले असल्याचे निष्पन्न झाले आहे तर भुसावळ येथे गेल्या आठवड्यात पकडण्यात आलेले एक पिस्तुल हे उमर्टी बनावटीचे नाही. उत्तर प्रदेशात अशा पिस्तुलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने हे पिस्तुल तेथूनच रेल्वे मार्गाने भुसावळात आल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.दहा हजारापासून पिस्तुल उपलब्धउमर्टी येथे तयार झालेले पिस्तुल हे दहा हजारापासून ते २० हजारापर्यंत मिळतात. उत्तर प्रदेशातील पिस्तुलचे दर हे अधिक आहेत.गुन्हेगारांमार्फतच हे पिस्तुल मिळतात. चोपडा भागातील सातपुडा जंगलाला लागून असलेले उमर्टी हे गाव मध्य प्रदेशात येते, त्यामुळे जळगाव पोलिसांना तेथे जाण्यासाठी मर्यादा आहेत. या गावात तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याचेही प्रसंग आहेत. त्यामुळे येथे जातांना जळगाव पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांची मदत घेतली आहे.गुन्हेगारीसाठी होतोय वापरपोलिसांनी पकडलेल्या या गावठी पिस्तुलचा वापर रस्ता लुट, खून, दरोडा या सारख्या गुन्ह्यात झालेला आहे. एक पिस्तुल तर पोलिसानेच उमर्टी येथून आणल्याचे निष्पन्न झाले होते. या पोलिसाला तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. भुसावळ, चोपडा व जळगाव या ठिकाणी सर्वाधिक पिस्तुल आढळून आलेले आहेत.

असे आहेत वर्षनिहाय पकडलेले पिस्तुलवर्ष        पिस्तुल    राऊंड    गुन्हे     आरोपी२०१३       ०८          ११        ०९       २२२०१४      ०४          ०२        ०४       ०५२०१५      २०          ६६        १६        ३१२०१६      २०          २८         १४       ३३२०१७      १२         १४        १४        २२एकुण      ६४         १२१       ५७      ११३