शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पारोळा रस्त्यावर माल वाहतूक टेम्पोच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 23:02 IST

श्रीनाथजी नगातील रहिवाशी व तालुक्यातील नगाव येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक भागवत महादू पाटील (५२) व त्यांच्या पत्नी अलका भागवत पाटील (४५) यांचा दुचाकीला माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती- पत्नी जागीच ठार झाले.

ठळक मुद्देअपघातानंतर वाहनचालक पसारपारोळा तालुक्यातील चहुत्रे फाट्या जवळील घटनादोघे जण गेले होते कासोदा येथे साई बाबा दर्शनासाठी

पारोळा : श्रीनाथजी नगातील रहिवाशी व तालुक्यातील नगाव येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक भागवत महादू पाटील (५२) व त्यांच्या पत्नी अलका भागवत पाटील (४५) यांचा दुचाकीला माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती- पत्नी जागीच ठार झाले. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी १.३० वाजता घडली.मुख्याध्यापक भागवत पाटील यांना दोन दिवस सुटी असल्याने आपल्या मूळ गावी मंगरुळ ता. पारोळा येथे गेले होते. बुधवारी हरितालिका असल्याने ते सकाळी पत्नी अलका यांना घेवून दुचाकीवरुन (क्र. एम.एच.१९- सी- एल-५८६८ वरुन कासोदा येथे साईबाबांचे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन घरी परतत असताना चहुत्रे ता. पारोळा या गावाच्या फाट्यावर समोरून पारोळ्याकडून कासोदाकडे जाणारा माल वाहतूक टेम्पो एम. एच.१९- सी.वाय- ०९३३ हा वेगाने जात असताना त्याने दुचाकीला जबरदस्त धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. यात पती-पत्नी जोरात खाली फेकले गेले. भागवत पाटील यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने कानातून रक्तस्राव सुरू झाला तर पत्नी अलका यांचा छातीला आणि पाठीला जबर मार लागल्याने त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.टेम्पो इतक्या भरधाव वेगाने होता की, त्याची दिशाच अपघातात बदलली. प्रसंगी परिसरातील शेतकरी, शेतमजूर यांनी धाव घेत या दाम्पत्यांना उचलून रस्त्यावर आणले. टेम्पो चालकाला चांगला चोप दिला. मात्र गर्दीतून चालक फरार झाला. दाम्पत्यांला जबर मार लागल्याने त्यांनी जागीच जीव सोडला. पारोळा येथून डॉ. सुनील पारोचे हे घटनास्थळी तत्काळ हजर झाले. त्यांनी तपासून मृत घोषीत केला. अपघात स्थळा पासून मुख्याध्यापक भागवत पाटील यांचे गाव दीड - दोन कि.मी अंतरावर होते.घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.एकाच वेळी अपघातात दाम्पत्यांच्या मृत्यूने आक्रोश करण्यात आला. शव पारोळा कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. या वेळी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी या ठिकाणी धाव घेत कुटुंबियांना धीर दिला. जितेंद्र पवार, सचिन पाटील,सुनील जाधव, देविदास सोनवणे, संदीप पाटील, गुणवंत पाटील, सुभाष निळ, यांच्यासह अनेक शिक्षक धावून आले.वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंके यांनी शवविच्छेदन केले. मुख्याध्यापक भागवत पाटील यांच्या पच्यात दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.रात्री पती- पत्नीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रत्यक्ष दर्शनी सांगतातपारोळ्याकडून कासोद्याकडे जाणारा टेम्पो हा भरधाव होता. कुरकुरे, व्हेपर्स व इतर साहित्याने भरलेला होता. चालक सह चालकाच्या जागेवर बसून एका अल्पवयीन मुलाला वाहन शिकवीत होता. यातच वाहनावरील त्याचे नियंत्रण सुटले व समोरून येणाºया मोटारसायकलवर जाऊन टेम्पो आदळली. दाम्पत्यांची काही एक चुकी नसतांना त्यांना जीव गमवावा लागला.पारोळा पोलीस ठाण्यात ईश्वर महादू पाटील यांचा फिर्यार्दी वरून टेम्पो चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू