जळगाव तालुक्यातील उमाळा येथे ट्रॅक्टर चालकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:11 IST2018-07-16T21:08:35+5:302018-07-16T21:11:11+5:30

जळगाव तालुक्यातील उमाळा येथे सुदाम हरी भील (वय ४५) या ट्रॅक्टर चालकाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता घडली.

Tractor driver suicides in Umala in Jalgaon taluka | जळगाव तालुक्यातील उमाळा येथे ट्रॅक्टर चालकाची आत्महत्या

जळगाव तालुक्यातील उमाळा येथे ट्रॅक्टर चालकाची आत्महत्या

ठळक मुद्देपत्नीशी वाद झाल्याने संतापात केले विष प्राशनजिल्हा रुग्णालयात मालवली प्राणज्योतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह

जळगाव : तालुक्यातील उमाळा येथे सुदाम हरी भील (वय ४५) या ट्रॅक्टर चालकाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुदाम हा रविवारी दारुच्या नशेत होता. पत्नीशी वाद झाल्याने त्या संतापात त्याने रात्री ९ वाजता विष प्राशन केले. मुलांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता रात्री १२ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मनोहर पाटील यांच्याकडे तो ट्रॅक्टरवर चालक होता, परंतु आता काही दिवसापासून तो मजुरी काम करीत होता. सोमवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मनोहर पाटील, उमाळा येथील सरपंच सुकलाल तुकाराम भील व दीपक पवार यांनी बाजार समितीची शववाहिका आणून मृतदेह गावात नेला. सुदाम याच्या पश्चात पत्नी देवकाबाई, मुलगा अजय, सोनू, सुकलाल व अतुल असा परिवार आहे.

Web Title: Tractor driver suicides in Umala in Jalgaon taluka