जळगावात कारवर धडकले ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 19:58 IST2018-06-27T19:57:00+5:302018-06-27T19:58:44+5:30
रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला वाचविण्यासाठी हळू केलेल्या कारवर मागून भरधाव वेगाने आलेले ट्रॅक्टर धडकले. त्यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी कारचे बंफर, डिक्की व लाईट याचे ७० ते ८० हजाराचे नुकसान झाले आहे.

जळगावात कारवर धडकले ट्रॅक्टर
जळगाव : रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला वाचविण्यासाठी हळू केलेल्या कारवर मागून भरधाव वेगाने आलेले ट्रॅक्टर धडकले. त्यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी कारचे बंफर, डिक्की व लाईट याचे ७० ते ८० हजाराचे नुकसान झाले आहे. हा अपघात बुधवारी सकाळी ११ वाजता अजिंठा चौक परिसरात झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्योजक अनिल पंढरीनाथ माळी (वय ५८, रा.रायसोनी नगर, जळगाव) यांची एमआयडीसीत एम.१२८ सेक्टरमध्ये लक्ष्मी रबर प्रॉडक्ट प्रा.लि.नावाची कंपनी आहे. बुधवारी पत्नी अंजली व मुलगा अजिंक्य यांना घेऊन चालक राजा अहमद मुसा शहा (रा.जोशी पेठ, जळगाव) हा कारने (क्र.एम.एच.१९ सी.क्यु.३५१५) कंपनीत येत असताना अजिंठा चौकाजवळ महाराजा हॉटेलसमोर एक महिला रस्ता ओलांडत असताना कार हळू करण्यासाठी चालकाने कारचा ब्रेक दाबला, त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणारे ट्रॅक्टर (क्र.एम.एच.१९ए.पी.८१५९) कारवर धडकले. त्यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक ईश्वर भास्कर कोळी (रा.राणीचे बांबरुड, ता. पाचोरा, ह.मु. मयुर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) याच्याविरुध्द मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.