भुसावळ येथे डीजेचा वीज वाहिनीला स्पर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:56 IST2019-02-09T23:55:09+5:302019-02-09T23:56:58+5:30
भुसावळ , जि.जळगाव : शहरातील वरणगाव रोडवरील लक्ष्मीनारायण नगर येथे गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ वीज वाहिनीला डीजेच्या गाडीचा स्पर्श झाल्याने मोठा ...

भुसावळ येथे डीजेचा वीज वाहिनीला स्पर्श
भुसावळ, जि.जळगाव : शहरातील वरणगाव रोडवरील लक्ष्मीनारायण नगर येथे गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ वीज वाहिनीला डीजेच्या गाडीचा स्पर्श झाल्याने मोठा स्फोट झाला. सुमारे ४० घरांना याचा फटका बसला असून, यातून लाखो रुपयांची विद्युत उपकरणे जळून खाक झाली. यामुळे संपूर्ण परिसरात अंधार झाला आहे.
वरणगाव रोडला लागून असलेल्या लक्ष्मीनारायण नगर व देना नगरचा काही भाग या जवळ असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर लटकलेल्या वीज वाहिनीला डीजेच्या गाडीचा स्पर्श झाला. याचा परिणाम होऊन या भागातील चाळीसपेक्षा जास्त घरातील विद्युत उपकरणे जळून खाक झाली. यात नागरिकांना लाखो रुपयांचा फटका बसला. टीव्ही, फ्रिज, एसी, इन्व्हर्टर अशा उपकरणाचा यात समावेश आहे. तसेच अनेकांच्या घरातील इलेक्ट्रीक फिटिंगसुद्धा जळून खाक झाली. एकाच वेळी सर्वांच्या घरांमध्ये विजेची मोठी समस्या निर्माण झाली. तसेच या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. मार्गावरील पथदिवे बंद पडले.
नुकसान झालेल्या नागरिकांमध्ये बी.आर.सरोदे, एस.यु.विसपुते, सुरेश वाणी, विनोद राणे, सचिन तायडे, सागर भंगाळे, गिरीश तायडे यांच्यासह चाळीसपेक्षा जास्त नागरिकांना नुकसान सोसावे लागले.