जळगावात मतीमंद युवतीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 13:06 IST2018-11-24T13:06:27+5:302018-11-24T13:06:46+5:30
आरोपीस दोन तासात अटक

जळगावात मतीमंद युवतीवर अत्याचार
जळगाव : भिलखेडा येथील शेतमजुराच्या मतीमंद मुलीवर गणेश शांताराम पाटील (वय २६) याने अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला शुक्रवारी गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, २३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास फिर्यादी पिता हा आपल्या मतीमंद मुलीसह वावडदानजीक भिलखेडा येथील आपल्या घरी होता. याच दरम्यान गावातील युवक गणेश शांताराम पाटील हा आला. गप्पा मारताना त्याने या मुलीच्या वडिलांना २० रूपये देऊन तंबाखुची पुडी आणायला सांगितली.
घरी येताच प्रकार आला लक्षात
आरोपी गणेश पाटील याने दिलेले पैसे घेऊन पिडीत मुलीचा पिता तंबाखू घेण्यासाठी गावात गेला.