ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनासाठी मशाल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:26+5:302021-07-14T04:19:26+5:30
टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचे राही सरनोबत (पिस्तूल शूटिंग), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), प्रवीण जाधव (आर्चरी रिकर्व्ह ) विष्णू ...

ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनासाठी मशाल रॅली
टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचे राही सरनोबत (पिस्तूल शूटिंग), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), प्रवीण जाधव (आर्चरी रिकर्व्ह ) विष्णू सरवानन (सेलिंग), स्वरूप उन्हाळकर (पॅराशूटिंग), सुयश जाधव (पॅरास्विमिंंग), तेजस्विनी सावंत (रायफल शूटिंग), उदयन माने (गोल्फ), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स), भाग्यश्री जाधव (पॅरा ॲथलेटिक्स) हे १० खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल येथे खेळाडूंच्या मशाल रॅलीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. डाॅ. प्रवीण मुंडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मशाल प्रज्वलित करून खेळाडूंच्या मशाल रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, कोर्ट परिसर-नवीन बसस्थानक- -आकाशवाणी चौक-काव्यरत्नावली चौक तिथून परत आकाशवाणी चौक व त्यानंतर जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप झाला.
या रॅलीत दिशा पाटील, संध्या मोरे, देवांश चांगळे हे राष्ट्रीय खेळाडू व इतर राज्यस्तर खेळाडू, पोलीस जलतरण तलावाचे खेळाडू, हॉकी व खो-खो प्रशिक्षण केंद्रावरील खेळाडू, बास्केटबॉल संघटनेचे खेळाडू या रॅलीत सहभागी झाले होते. क्रीडा अधिकारी एम.के.पाटील, रेखा पाटील, सुजाता गुल्हाणे, क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, मीनल थेारात, राजेंद्र चव्हाण, रणजित पाटील, कमलेश नगरकर, नीलेश बाविस्कर, नयन राणे, गोविंद सोनवणे, संजय मेहेरे, विनोद कुलकर्णी, विनोद माने, सूरज पवार आदी सहभागी झाले होते.