चोपडा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:41+5:302021-09-12T04:20:41+5:30
या दोन्ही विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी शिक्षण मंडळातर्फे संस्थेचे अध्यक्ष व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता ...

चोपडा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी राज्यात अव्वल
या दोन्ही विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी शिक्षण मंडळातर्फे संस्थेचे अध्यक्ष व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, संचालक व माजी उपप्राचार्य डी. बी. देशमुख, पॉलिटेक्निकचे प्राचार्य व्ही. एन. बोरसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचवेळी पत्रकार परिषद संपन्न झाली.
पत्रकार परिषदेत बोलताना संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात एकूण ३८७ पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. या सर्व कॉलेजमधून चोपडा येथील पॉलिटेक्निकचा मैत्रेय वाणी हा विद्यार्थी महाराष्ट्रात सर्वप्रथम आला आहे आणि शितिज शैलेंद्र अग्रवाल हा विद्यार्थी महाराष्ट्रातून सहावा आलेला आहे. या दोघा विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेला नावलौकिक मिळाला आहे. या दोन विद्यार्थ्यांमुळे यशामुळे चोपडा तालुक्याचा हा सन्मान आहे. कोविडच्या काळातही ऑनलाइन अध्यापन करून प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांची उत्तमरित्या तयारी करून घेतली.
यावेळी विभागप्रमुख नितीन पाटील, पी. जी. पाटील, एस. एस. बाविस्कर, पी. के. चौधरी, एस. एस. पाटील, टी. बी. वाघ आदी उपस्थित होते.
110921\11jal_2_11092021_12.jpg~110921\11jal_3_11092021_12.jpg
चोपडा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी राज्यात अव्वल~चोपडा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी राज्यात अव्वल