या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, या कार्यशाळेत दोन सत्रात निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर केळी संशोधन केंद्राचे डॉ. सी. डी. बडगुजर, निर्यातक्षम केळी उत्पादनात ॲपेडाची भूमिका यावर ॲपेडाचे प्रभारी अधिकारी लोकेश गौतम, निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी उत्कृष्ट शेती पद्धत यावर डॉ. के. बी. पाटील, तर दुपारच्या सत्रात केळी पिकांवरील कीडरोग नियंत्रणावर पाल कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी डॉ. महेश महाजन, केळी मूल्य संवर्धनावर शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. नेहते, निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी संशोधनाची गरज या विषयावर कृषी अधीक्षक कार्यालयाचे उपसंचालक डॉ. अनिल भोकरे व ममुराबाद संशोधन केंद्राचे डॉ. किरण जाधव, तर निर्यातक्षम केळी उत्पादनातील वाढ या विषयावर केळी निर्यातदार अझहर पठाण व तांत्रिक मार्गदर्शन अतुल पाटील करणार आहेत.
निर्यातक्षम केळी उत्पादका़ंसाठी उद्या कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:21 IST