... तोपर्यंत शिवसेना खडसेंना मदत करणार नाही, एकनाथराव संभ्रम निर्माण करतायेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 16:40 IST2019-03-26T16:39:40+5:302019-03-26T16:40:28+5:30
जळगाव : शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील

... तोपर्यंत शिवसेना खडसेंना मदत करणार नाही, एकनाथराव संभ्रम निर्माण करतायेत
जळगाव - भाजपा आमदार एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे हे संभ्रम निर्माण करीत आहेत. शिवसेना आपल्यासोबत असल्याचा दावा करत आहेत, पण जोपर्यंत युतीच्या अधिकृत समन्वयकांच्या माध्यमातून समाधान कारक तोडगा निघणार नाही, तोपर्यंत लोकसभा मतदारसंघात शिवसेना सहकार्य करणार नाही, अशी भूमिका शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चंद्रकांत पाटील यांना गळाला लावण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर घाईघाईने मंगळवारी दुपारी त्यांनी पत्रकार परिषद बोलवून ही भूमिका मांडली. ते म्हणाले की, खडसेंनी कधीच युती धर्म पाळला नाही. अगदी आताही शिवसैनिकांचे भाजप प्रवेश करवून घेतले जात आहेत. खडसेंना शिवसेनेची साथ हवी असेल तर रावेर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना समन्वयक मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत समाधान कारक तोडगा निघाल्याशिवाय शिवसेना भाजपासोबत काम करणार नाहीं, असे त्यांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रवादीकडून येणाऱ्या ऑफर्स विषयी प्रश्नांना त्यांनी बगल दिली. त्यामुळे एकनाथ खडसेंना आपल्या सुनबाई रक्षा खडसेंच्या खासदारकीसाठी शिवसेनेची समजूत काढावी लागणार आहे. अन्यथा, शिवेसना नेत्यांच्या बंडाचा सामना रक्षा खडसेंना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारी पडू शकतो.