Time to apply for a hankering on 5 bones | जामठीत अडकलेल्या वºहाडींवर आली भिक मागण्याची वेळ

जामठीत अडकलेल्या वºहाडींवर आली भिक मागण्याची वेळ


जामठी, ता. बोदवड : सध्या संचारबंदी मुळे कोणतेही प्रवासाचे साधन नसल्याने बोदवड तालुक्यातील जामठी येथे सलीम शहा हैदर शहा फकीर यांच्या मुलाच्या लग्नासाठी २२ रोजी सुरत व नंदुरबार येथून आलेले नवरीकडचे एकुण ३५ वºहाडी हे जामठी येथेच अडकून पडले आहे. सलीम शहा हैदर शहा फकीर यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून घरचे २० ते २५ जण व त्यात या वºहाडींची भर यामुळे सर्वांवर भिक मागण्याची वेळ आली आहे. काहींनी त्यांना किरणा दिला आहे. तसेच गावातील केब खोदकाम चालू असताना पर जिल्ह्यातील ५ कुटुंबही अडकले असून त्यांना येवती येथील महेश अहीर यांनी स्वत: तीन हजार रुपये किंमतीचा किरणा घेऊन दिला.

Web Title: Time to apply for a hankering on 5 bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.