सावखेड्याजवळ द बर्निग ट्रक चा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 19:22 IST2018-06-26T19:18:59+5:302018-06-26T19:22:01+5:30
धरणगांव चोपडा मार्गावरील सावखेडा गावाबाहेर मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार नागरिकांनी २६ रोजी दुपारी अनुभवला.

सावखेड्याजवळ द बर्निग ट्रक चा थरार
धरणगाव : धरणगांव चोपडा मार्गावरील सावखेडा गावाबाहेर मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार नागरिकांनी २६ रोजी दुपारी अनुभवला. आगीत चारचाकीचे पुर्ण नुकसान झाले आहे. चालक व वाहकाने प्रसंगावधान राखत गाडीबाहेर उडी मारल्याने प्राणहानी टळली. ही घटना शॉर्ट सर्किंटमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
मंगळवार २६ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास धरणगाव चोपडा मार्गावरून मध्य प्रदेशाकडे जाणारी मालवाहू चारकचाी क्र. एम.पी.६८ एच - १५७ ने सावखेडा गावाबाहेर अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच वाहक व चालकांनी खाली उड्या मारल्या. गाडीत पी.व्ही.सी.पाईप तयार करण्यासाठी लागणाºया ग्रॅलुक्स भरलेले होते. त्यामुळे आग अधिकच भडकली . खा.शि.मंडळाचे अध्यक्ष अनिल कदम यांनी चोपडा न.पा.ला फोन करीत अग्निशमन विभागाच्या वाहनांना बोलविले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी आगीवर नियंत्रण मिळविले . या घटनेमुळे अर्धा ते पाऊण तापापर्यंत दोन्ही बाजूची रहदारी पुर्णत:ठप्प झालेली होती.