जळगाव : संशयावरून पत्नीस पेट्रोल टाकून पेटविले; हिंगोणे बुद्रूक येथील रात्रीचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 18:54 IST2023-04-03T18:54:47+5:302023-04-03T18:54:59+5:30

संशयावरून महिलेला तिच्या पतीनेच पेट्रोल टाकून पेटवून दिले.

Thrill of the night in Hingone Budruk by throwing petrol on his wife out of suspicion | जळगाव : संशयावरून पत्नीस पेट्रोल टाकून पेटविले; हिंगोणे बुद्रूक येथील रात्रीचा थरार

जळगाव : संशयावरून पत्नीस पेट्रोल टाकून पेटविले; हिंगोणे बुद्रूक येथील रात्रीचा थरार

भगीरथ  माळी

धरणगाव, जि. जळगाव : संशयावरून महिलेला तिच्या पतीनेच पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात या महिलेचा मृत्यू झाला. ही थरारक घटना हिंगोणे बुद्रूक ता. धरणगाव येथे रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली.
मीराबाई संतोष भिल (५५) असे या मृत महिलेचे नाव आहे. हिंगोणे बुद्रूक येथील संतोष आखाडे भिल (६३) हा सध्या रिंगणगाव ता. एरंडोल येथे राहतो. त्याची पत्नी मीराबाई ही हिंगोणे बुद्रूक येथे राहते. या दोघांचेही पटत नसल्याने ते वेगवेगळे राहत होते. रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास संतोष हा हिंगोणे येथे आला व त्याने मीराबाईच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.

या घटनेत मीराबाई पूर्णपणे भाजली तर संतोष हा ५५ टक्के भाजला. मिराबाई हिला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला तर संतोष याच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठत मदत केली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Thrill of the night in Hingone Budruk by throwing petrol on his wife out of suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.