आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २२ : चार मुली झाल्या तरी मुलगा होत नाही म्हणून पत्नीचा सतत छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात पती शरीफ वहाब खाटीक (रा.वावडदे, ता.जळगाव) याला गुरुवारी न्यायालयाने दोन कलमाखाली अनुक्रमे दोन व तीन वर्षाची शिक्षा सुनावली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर येथील शाहीस्ता खाटीक यांचे वावडदे येथील शरीफ खाटीक याच्याशी २००७ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशासाठी शाहीस्ता यांच्याकडे तगादा लावला होता. ही मागणी पुर्ण केल्यानंतरही तिचा छळ सुरुच होता. या काळात शाहीस्ता व शरीफ यांना चार मुली झाल्या. मुलगा होत नसल्याने पतीसह सासरच्यांनी तिचा छळ केला. त्यामुळे शाहीस्ता यांनी अमळनेर येथील कौटुंबिक सल्ला केंद्राकडे तक्रार केली होती. तेथे पती-पत्नीत समेट घडवून आणला होता.भविष्यात पत्नीला त्रास देणार नाही असा करारनामाही झाला होता. त्यानंतरही पतीने तुला मुलगा जन्माला येत नाही तोपर्यंत तुझा छळ करतच राहिल असे सांगून छळ सुरु ठेवला. या छळाला कंटाळून शाहीस्ता यांनी ३० सप्टेबर २०१४ रोजी वावडदे येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.करारनामा ठरला महत्वाचा पुरावादरम्यान, शाीहस्ता यांची आई नसीनबी भिकन खाटीक यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरुन पती शरीफ खाटीक याच्याविरुध्द ४९८ अ व ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी अशोक अहिरे यांनी गुन्ह्याचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. न्या.चित्रा हंकारे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. या खटल्यात अमळनेर येथील करारनामा महत्वपूर्ण ठरला. सरकारपक्षातर्फे अॅड.चारुलता बोरसे यांनी प्रभावीपणे युक्तीवाद केला. न्यायालयाने शरीफ याला कलम ४९८ अ नुसार २ वर्ष तर कलम ३०६ नुसार तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजाराचा दंड सुनावला. आरोपीतर्फे अॅड.सागर चित्रे यांनी काम पाहिले.
जळगाव तालुक्यात पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला तीन वर्षाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:37 IST
चार मुली झाल्या तरी मुलगा होत नाही म्हणून पत्नीचा सतत छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात पती शरीफ वहाब खाटीक (रा.वावडदे, ता.जळगाव) याला गुरुवारी न्यायालयाने दोन कलमाखाली अनुक्रमे दोन व तीन वर्षाची शिक्षा सुनावली.
जळगाव तालुक्यात पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला तीन वर्षाची शिक्षा
ठळक मुद्दे जळगाव न्यायालयाचा निकाल मुलगा होत नसल्याने केला होता छळपत्नीने गळफास घेऊन केली होती आत्महत्या