शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने रस्त्यांचे तीन-तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 21:35 IST

वाढते अपघात : यावलच्या मुख्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची कसरत

ठळक मुद्देमोठ्या खड्डयामुळे ट्रॉली उलटली

यावल : सततच्या पावसाने शहरासह तालुक्यातील रस्त्यांचे तीन-तेरा वाजले असून वाहनधरकांना वाहने चालवतांना कसरत करावी लागत आहे. अनेकदा यामुळे अपघातही घडत आहेत.बºहाणपुर - अंकलेश्श्वर महामार्गावर शहरातील बुरूज चौकापासून तर भुसावळ पर्यंत खड्डेच खड्डे पडले असल्याने वाहने चालवतांना कसरत करावी लागत आहे. येथील बुरूज चौकाजवळील रस्त्यात तर चार फुट यासाचे आणि सुमारे एक फुट खोलीचे खड्डे पडले आहेत. यात पाणी साचल्याने खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होतात.१५ दिवसापुर्वीच म्हणजे निवडणुकी दरम्यान मतदारांचा संताप होवू नये म्हणून बांधकाम विभागाने थातुर-मातुर दुरूस्ती केली होती. नेमक्या त्याच ठिकाणी दुरूस्ती केली मात्र या कामाचे तीन तेरा वाजले असल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे.मोठ्या खड्डयामुळे ट्रॉली उलटलीरविवारी यावल येथील शेतकरी नाना महाजन हे त्यांच्या शोतील ज्वारी बाजार समीतीमध्ये विक्रीस आणत असतांना बुरूज चौकाजवळ रस्त्यातील खड्डयात ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक गेल्याने ट्रॉली उलटली. त्यामुळे ट्रॉलीमधील संपुर्ण १५ क्विटल ज्वारी ज्वारी रस्त्यावर सांडली. रस्त्यात सर्वत्र पाणीच पाणी व चिखल असल्याने ज्वारीचे संपुर्ण नुकसान झाले असून महाजन यांना ऐन दुष्काळी स्थितीत सुमारे १८ हजारांचा फटका बसला आहे. केवळ खड्डयामुळे हा अपघात झाला असून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.