मोंढाळे जवळ कार व ट्रक अपघातात तीन जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 16:36 IST2018-10-08T16:35:30+5:302018-10-08T16:36:48+5:30
आशिया महामार्ग ४६ वर मोंढाळे ता. पारोळा शहराजवळ सोमवारी सकाळी ७ वाजता कार व ट्रक यांची सामोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात कार मधील एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले.

मोंढाळे जवळ कार व ट्रक अपघातात तीन जण जागीच ठार
पारोळा, जि.जळगाव -आशिया महामार्ग ४६ वर मोंढाळे ता. पारोळा शहराजवळ सोमवारी सकाळी ७ वाजता कार व ट्रक यांची सामोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात कार मधील एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले. तर ४ जण गंभीरपणे जखमी झाले आहेत.
ठार झालेल्यांमध्ये वडील- मुन्ना शेख (४५) मुलगा उमेरा मुन्नाभाई (५), हसनेन मुन्नाभाई (७, रा.गोपीतलाव नमकवाली गल्ली सुरत) हे जागीच ठार झाले.
जावेदभाई, सैनाज, सना, फरजना शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. या चौघांना धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या कुटुंबातील १७ जण हे दोन चारचाकींमधून सुरतहून नशिराबाद ता. जि. जळगाव येथे अरफाक खान सुरत यांची बहीण शिरीन बी हिच्या खोळभरणीच्या कार्यक्रमासाठी जात होते.