ब्लॅकमेल करुन तीन जणांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 11:57 IST2019-08-01T11:56:47+5:302019-08-01T11:57:09+5:30

गुन्हा दाखल : अत्याचार करणारे दोन मुले अल्पवयीन ; एकाला अटक, दोन ताब्यात

Three men blackmailed and abused by a minor girl | ब्लॅकमेल करुन तीन जणांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ब्लॅकमेल करुन तीन जणांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जळगाव : मोबाईलवर झालेल्या संवादाची क्लीप व्हायरल करण्याची धमकी देत तीन मुलांनी नांद्रा, ता. जळगाव येथील नदीपात्रात पंधरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे अत्याचार करणारे दोन मुलेही अल्पवयीनच असून त्यांना बुधवारी ताब्यात घेण्यात आले आहे. तर पवन कैलास सोनवणे (१८) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात बाललैंगिक अत्याचार व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित मुलीचे वय पंधरा वर्ष नऊ महिने आहे. एका मुलाचे पीडितेशी सतत मोबाईलवर बोलणे झाले होते. त्याचे रेकॉर्डींग त्याने केले होते. त्यामुळे पवनसह तिघं मुले पीडितेला अनेक दिवसापासून ब्लॅकमेल करीत होते. आम्ही सांगू तेथे तू आली नाही तर ही रेकॉर्डींग व्हायरल करु व तुझ्या घरी पण सांगू अशी धमकी देत पीडितेला तिघांनी १८ जुलै रोजी रात्री साडे आठ वाजता नांद्रा बु., ता.जळगाव येथील नदीपात्रात बोलावले. तेथे आल्यावर या तिघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. पीडितेने हा प्रकार मामाला सांगितल्यानंतर दोघांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व वासुदेव मराठे करीत आहेत.

Web Title: Three men blackmailed and abused by a minor girl