कुंटणखाना प्रकरणातील तिघांना २६ पर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 20:54 IST2020-05-23T20:54:33+5:302020-05-23T20:54:42+5:30
जळगाव : खेडी रस्त्यावरील हाय प्रोफाईल कुंटणखाना प्रकरणातील तिघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, सुनावणीअंती २६ मे पर्यंत पोलीस ...

कुंटणखाना प्रकरणातील तिघांना २६ पर्यंत पोलीस कोठडी
जळगाव : खेडी रस्त्यावरील हाय प्रोफाईल कुंटणखाना प्रकरणातील तिघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, सुनावणीअंती २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
सहायक पोलीस अधीक्षक डॉ़ निलाभ रोहन यांच्यासह एलसीबीच्या पथकाने खेडी रस्त्यावरील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल कुंटणखान्यावर धाड टाकली होती़ यावेही पराग प्रकाश लोहार व दोन महिलांना पोलिसांनी अटक केली होती़ नंतर त्या महिलांना आशादिप महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते़ नंतर शनिवारी पराग व दोन्ही महिलांना न्यायालयात एमआयडीसी पोलिसांनी हजर केले असता त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
रहिवाश्यांनी मानले आभार
पराग लोहार याच्या नेहमीच्या त्रासाला अपार्टमेंटमधील वैतागले होते़ अखेर पोलिसांनी कारवाई केल्यामुळे शनिवारी सकाळी अपार्टमेंटमधील काही रहिवाश्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात येवून पोलिसांचे आभार मानले़ तसेच आता पोलीस फरार असलेला मुरली देविदास चव्हाण याच्या शोध घेत आहेत़