जामनेर येथे मोकाट गुरांच्या हल्ल्यात तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 17:32 IST2019-09-01T17:31:27+5:302019-09-01T17:32:30+5:30
रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे वाहतुकीला होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी नगरपालिकेने मोहीम सुरू केली असून, रविवारी वाकी रोडवर कारवाईसाठी गेलेल्या एका पालिका कर्मचाऱ्यांसह तीन जण जखमी झाले.

जामनेर येथे मोकाट गुरांच्या हल्ल्यात तीन जखमी
जामनेर, जि.जळगाव : रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे वाहतुकीला होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी नगरपालिकेने मोहीम सुरू केली असून, रविवारी वाकी रोडवर कारवाईसाठी गेलेल्या एका पालिका कर्मचाऱ्यांसह तीन जण जखमी झाले.
शहरातील मुख्य रस्त्यावर बसणाºया मोकाट गुरांचा त्रास वाढल्याने पालिकेने गुरे जप्तीची मोहीम सुरू केली. गुरांना पकडण्यासाठी गेलेल्या दीपक मिस्त्री, गोपाळ बुळे व मुकेश सरताले यांच्यावर गुरांनी हल्ला चढविल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, रविवारी पालिकेने १७ गुरे जमा केली. रमेश हिरे, देवानंद सुरवाडे, दत्तू जोहरे यांनी कारवाई केली. मोकाट गुरांच्या मालकांनी बंदोबस्त करावा, अन्यथा पालिका गुरांचा मालकावर कारवाई करेल असे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले.