शॉर्ट सर्किटमुळे तीन घरांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 19:03 IST2019-06-23T19:02:37+5:302019-06-23T19:03:11+5:30
सोयगाव येथील घटना

शॉर्ट सर्किटमुळे तीन घरांना आग
सोयगाव: तालुक्यातील गलवाडा येथे दुपारी एक वाजेच्या दरम्यान तीन घराला आग लागून संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले त्यामुळे मोठे नुकसान झाले.
शामराव जाधव , धनराज जाधव व दत्तू जाधव यांच्या घराला दुपारी ही आग लागली. त्यात टीव्ही पंखा व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले याबाबत महसूल विभागाने पंचनामा केला आहे