डेंग्यूचे तीन रुग्ण
By Admin | Updated: November 18, 2014 14:32 IST2014-11-18T14:32:16+5:302014-11-18T14:32:16+5:30
गिरणा परिसरात तीन मुलांना डेंग्यू झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे. दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

डेंग्यूचे तीन रुग्ण
चाळीसगाव : गिरणा परिसरात तीन मुलांना डेंग्यू झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे. दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
लोंढे, ता. चाळीसगाव येथील सागर प्रमोद भोसले (वय ७) व वंदन राठोड ( ४) यांना, बांबरुड (राणीचे) येथे निखिल सुशील शिंदे (वय ९) या बालकाला डेंग्यूची बाधा झाली आहे, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.
लोंढे आरोग्य केंद्राचे अधिकारी मात्र याविषयी अनभिज्ञ होते. यानंतर गावकर्यांमध्ये प्रशासनाविषयी नापसंती व्यक्त करण्यात आली.