खंडणीप्रकरणी तीन दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:11 IST2019-09-23T23:11:09+5:302019-09-23T23:11:13+5:30
अमळनेर : खंडणी प्रकरणी येथील अनंत निकम यांना येथील न्यायालयाने सोमवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. येथील कृषी ...

खंडणीप्रकरणी तीन दिवसांची पोलीस कोठडी
अमळनेर : खंडणी प्रकरणी येथील अनंत निकम यांना येथील न्यायालयाने सोमवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
येथील कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक सचिन लांडगे यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी निकम यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांना येथील प्रथम न्यायदंडाधिकारी न्या.सुषमा अग्रवाल यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.