फैजपूर: चिखली ता. यावल येथील ज्वारीची पोती चोरणाऱ्या तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या कडून सहा हजार पाचशे रुपये किंमतीची १३ पोती ज्वारी हस्तगत करण्यात आली आहे.चिखली येथीलच जितेंद्र ब्रिजलाल पाटील, कृष्णा वना बादशाह व नितीन प्रवीण तायडे या तिघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. चिखली येथील सोपान वासुदेव पाटील या शेतकऱ्याची १६ रोजी ज्वारीची पोती चोरी झाली होती. या प्रकरणी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन सपोनि प्रकाश वानखडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पोकॉ गोकुळ तायडे, किरण चाटे, अनिल महाजन, महेश वंजारी, उमेश सानप यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
ज्वारीची पोती चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 18:10 IST