चोपड्यात हजारो मधुमेही रुग्णांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 15:08 IST2020-03-02T15:07:23+5:302020-03-02T15:08:12+5:30

अलविदा डायबिटीज शिबिरात डॉ.मल्हार देशपांडे व डॉ.उज्ज्वल कापडनीस यांनी मधुमेह आजार होण्याची कारणे, निवारण व संपूर्ण नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले.

 Thousands of diabetic patients comfort in Chopad | चोपड्यात हजारो मधुमेही रुग्णांना दिलासा

चोपड्यात हजारो मधुमेही रुग्णांना दिलासा

ठळक मुद्देचोपड्याच्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्रात अलविदा डायबिटीज कार्यक्रमडॉ.मल्हार देशपांडे व डॉ उज्ज्वल कापडनीस यांचे मार्गदर्शन

चोपडा, जि.जळगाव : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात दोन दिवसीय आयोजित अलविदा डायबिटीज शिबिरात डॉ.मल्हार देशपांडे व डॉ.उज्ज्वल कापडनीस यांनी मधुमेह आजार होण्याची कारणे, निवारण व संपूर्ण नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले. त्यात नियमित व्यायाम, आहार व मेडिटेशनचे महत्व स्पष्ट करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांनी केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कैलास पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन अ‍ॅड.घनशाम पाटील, डॉ.राहुल पाटील, डॉ.तृप्ती पाटील, डॉ.प्रेमचंद महाजन, डॉ.दीपक पाटील, डॉ.लोकेंद्र महाजन, विश्वनाथ अग्रवाल, नीता अग्रवाल, गौतम छाजेड, राजू शर्मा, संध्या शर्मा, संजय शर्मा, नीताबेन शर्मा, जगदीश चौधरी, यशवंत चौधरी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
ब्रम्हकुमारीज मेडिकल विंगद्वारा २९ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित राजयोगी जीवन शैलीद्वारे निरोगी जीवन उपक्रमा अंतर्गत अलविदा डायबिटीज दोन दिवसीय शिबिर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात झाले.
अलविदा डायबिटीज शिबिरात तालुक्यातून १५०० मधुमेह झालेल्या रुग्णांनी नोंदणी केली होती. शिबिरात आलेल्यांना सकाळी १० ते सायंकाळी सहापर्यंत थांबून शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वितेसाठी चोपडा येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्राच्या संचालिका ब्रम्हकुमारी मंगला दीदी व ब्रम्हकुमारी राज दीदी यांच्यासह ओमशांती परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title:  Thousands of diabetic patients comfort in Chopad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.