शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावर कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 22:09 IST

खबरदारी : वाढत्या गर्दीमुळे श्वानपथकाचीही घेतली मदत

भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे सणासुदीसाठी विशेष गाड्या सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर येथील रेल्वे स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सज्जतेसह श्वान पथकाकडूनही कसून तपासणी करण्यात येत आहे.सणासुदीच्या दिवसांमध्ये रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात विशेष गाड्या सोडण्यात येत आहे. याशिवाय भुसावळ रेल्वे स्थानकावर दररोज १३० पेक्षा जास्त गाड्या ये-जा करत असतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनातर्फे संपूर्ण रेल्वेस्थानक परिसरामध्ये १२४ पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहे. याशिवाय रेल्वे सुरक्षा बलाचे जवान व लोहमार्ग पोलिसांचाही खडा पहारा राहतो. अधिक गर्दीच्या कालावधीत भुसावळ सारख्या महत्त्वाच्या जंक्शन स्थानकावर अनुचित प्रकार घडू नये याकरिता श्वान ‘अमर’ द्वारे भुसावळ रेल्वे स्थानकावरील कानाकोपºयातही असलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली. सहाय्यक फौजदार एस. आर. सपकाळे व कॉन्स्टेबल गजानन पाटील यांनी श्वान अमरच्या सहाय्याने संपूर्ण रेल्वेस्थानकाची संदिग्ध सामानाची तपासणी केली.आरपीएफ जवानांचा पहारारेल्वेस्थानकाच्या दक्षिणेकडील मुख्य व उत्तरेकडील प्रवेशद्वारा समोर प्रत्येक येणाºया प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची करडी नजर ठेवली आहे.याशिवाय प्रत्येक प्रवाशांकडे असलेल्या सामानाची मशिनरीद्वारे तपासणी केली जाते तसेच येणाºया प्रत्येक प्रवाशाला मेटल डिटेक्टर मधून जावे लागते. एकंदरीत रेल्वे प्रशासन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने घेत असल्याचे दिसून येत आहे.