"या सरकारचे डेथ वॉरंट निघाले आहे", संजय राऊतांचा हल्लाबोल

By विलास.बारी | Updated: April 23, 2023 15:02 IST2023-04-23T15:01:35+5:302023-04-23T15:02:09+5:30

"या सरकारचे डेथ वॉरंट निघाले आहे", संजय राऊतांचा हल्लाबोल

"This government's death warrant has been issued", Sanjay Raut's attack | "या सरकारचे डेथ वॉरंट निघाले आहे", संजय राऊतांचा हल्लाबोल

"या सरकारचे डेथ वॉरंट निघाले आहे", संजय राऊतांचा हल्लाबोल

- विलास बारी

जळगाव : शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात लवकरच न्यायालयात निकाल लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यात हा निकाल लागणे अपेक्षित असताना निकाल लांबला आहे. आम्ही निकालाची वाट पाहत आहोत, मात्र या सरकारचे डेथ वाॅरंट निघाले असल्याचा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी रविवारी जळगावात केला आहे.

पाचोरा येथील शिवसेनेचे माजी आमदार स्व.आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण व जाहीर सभेस  शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी जळगावात दाखल झाले आहे. या सभेपूर्वीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडत आहेत.

खासदार राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेसोबत गद्दारी करून जे निघून गेले त्यांना आता पक्षात प्रवेश नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेतून निघून गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाईबाबत न्यायालयात निकाल प्रलंबित आहे. फेब्रुवारी महिन्यात हा निकाल लागेल असे वाटत होते. मात्र निकाल लांबत आहे. मात्र १५ दिवसात हा निकाल लागेल आणि हे सरकार पडेल असे त्यांनी सांगितले. या सरकारचे डेथ वाॅरंट निघाले असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: "This government's death warrant has been issued", Sanjay Raut's attack