मोबाईल लांबविल्याच्या प्रकरणात तिसरा संशयित जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 21:21 IST2021-01-08T21:21:19+5:302021-01-08T21:21:30+5:30
जळगाव : मेहरूण चौपाटीवर फिरण्यासाठी आलेल्या मित्र-मैत्रिणीला तिघांनी चॉपरचा धाक दाखवून लुटले होते़ याप्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी तिसरा संशयित शेख ...

मोबाईल लांबविल्याच्या प्रकरणात तिसरा संशयित जेरबंद
जळगाव : मेहरूण चौपाटीवर फिरण्यासाठी आलेल्या मित्र-मैत्रिणीला तिघांनी चॉपरचा धाक दाखवून लुटले होते़ याप्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी तिसरा संशयित शेख शकील शहा रूबाब शहा (२१, रा़तांबापूरा) याला सुरत येथून अटक केली आहे. त्यास शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
इंद्रजित देशमुख हा तरूण गावाहून आलेल्या मैत्रिणीसोबत १६ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील मेहरूण तलाव परिसरात फिरण्यासाठी आला होता. दोघांना चॉपरचा धाक दाखवून तिघांनी मोबाईल हिसकावून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत पोलिसांनी राहुल राजू गवळी, शोएब शेख उर्फ माकोडा शेख नरूद्दीन यांना अटक करण्यात आलेली आहे. तिसरा संशयित शेख शकील शहा रूबाब शहा याला सुध्दा सुरत येथून अटक करण्यात यश आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, मिलिंद सोनवणे, किशोर पाटील, सचिन पाटील यांनी केली आहे.