नेरी येथील तरुणाचा खून विचारपूर्वक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:31 IST2019-03-15T23:31:43+5:302019-03-15T23:31:59+5:30

आई-वडिलांचा आरोप

Think of blood of a youth at Neri | नेरी येथील तरुणाचा खून विचारपूर्वक

नेरी येथील तरुणाचा खून विचारपूर्वक

नेरी, ता.जामनेर : येथील संदीप पवार याच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या कोमल पवार हिने केलेले आरोप हे बिनबुडाचे असून विचार विनिमय करून हा खून केला असल्याचे तिचे सासू सासरे यांनी सांगितले.
३ रोजी येथील रहिवाशी संदीप पवार याचा त्याची पत्नी कोमल हिने खून केला होता. याप्रकरणी संदीप पवार आपले मानसिक व शाररिक छळ करून तिसऱ्या लग्नाच्या विचारात होता त्यामुळे आपण त्याचा खून केल्याचे कोमल हिने पोलिसांना सांगितले होते. मात्र सुनेने केलेले हे आरोप तिचे सासू सासरे कौशल्याबाई व उत्तम पवार यांनी फेटाळून लावले. जर कोमलला खरंच संदीपकडून मारहाण सुरु असती किंवा तिसरे लग्नाचे बोलला असता तर इतक्या दिवसात तिने आम्हाला एकदाही याबाबत सांगितले नाही किंवा आपल्या माहेरी असलेल्या आई व आजोबांना कळविले नाही. मग आताच असं कसे ती म्हणू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे खुनाच्या आदल्या रात्री तिचे आजोबा हे याच ठिकाणी सायंकाळी ७ वाजेपर्यंत हजर होते. तेव्हादेखील ती त्यांच्या जवळ बोलू शकली असती आणि त्यानंतर देखील त्याच रात्री तिने १०. ४५ वाजता माहेरी फोन करून सर्व आलबेल असल्याचे सांगितले. या खुनाचे खरे कारण लोकांपर्यंत पोहचण्यासाठी योग्य ती चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील उत्तम पवार यांनी केली.

Web Title: Think of blood of a youth at Neri

टॅग्स :Jalgaonजळगाव