चोरट्यांनाही हवे 'थंडा थंडा कुल कुल', कुसूंबा शिवारातून चार कुलर, गॅस सिलिंडर लांबविले

By सागर दुबे | Updated: April 15, 2023 16:10 IST2023-04-15T16:09:53+5:302023-04-15T16:10:59+5:30

गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी डोके वर काढले असून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.

Thieves theft four coolers gas cylinder extended from Kusumba Shivara jalgaon more heat | चोरट्यांनाही हवे 'थंडा थंडा कुल कुल', कुसूंबा शिवारातून चार कुलर, गॅस सिलिंडर लांबविले

चोरट्यांनाही हवे 'थंडा थंडा कुल कुल', कुसूंबा शिवारातून चार कुलर, गॅस सिलिंडर लांबविले

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी डोके वर काढले असून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी कुसूंबा शिवारातील विशाल कुलर नावाच्या फॅक्टरीतून चार कुलर आणि एक गॅस सिलेंडर चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अयोध्या नगर येथील विशाल भागवत ढवळे यांची कुसुंबा शिवारातील हॉटेल शिवशाही हॉटेलजवळ विशाल कुलर नावाची फॅक्टरी आहे. ढवळे हे गुरूवारी मध्यरात्री १२.१० वाजेच्या सुमारास फॅक्टरी बंद करून घरी निघून गेले होते. त्यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी फॅक्टरीच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि चार कुलर व गॅस सिलिंडर चोरून नेले.

शुक्रवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कामगार अजय मिंझ हा फॅक्टरीवर आला. तेव्हा त्याला १६ पैकी ४ कुलर कमी दिसले तर गॅस सिलेंडर सुध्दा चोरीला गेलेले दिसून आले. त्यांनी लागलीच मालक विशाल यांना संपर्क साधून फॅक्टरीमध्ये चोरी झाल्याची माहिती दिली. विशाल ढवळे यांनी फॅक्टरी गाठून पाहणी केली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. रामकृष्ण पाटील करीत आहे.

Web Title: Thieves theft four coolers gas cylinder extended from Kusumba Shivara jalgaon more heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.