शिवकॉलनीतील बंद घरात चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 21:09 IST2021-03-06T21:09:27+5:302021-03-06T21:09:37+5:30

१० हजाराची रोकड लंपास : पोलिसात गुन्हा दाखल

Thieves in a closed house in Shiv Colony | शिवकॉलनीतील बंद घरात चोरट्यांचा डल्ला

शिवकॉलनीतील बंद घरात चोरट्यांचा डल्ला

जळगाव - शहरातील शिवकॉलनी येथील चंद्रकांत मोहन बाविस्कर यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी घरातून दहा हजारांची रोकड लंपास केली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

चंद्रकांत बाविस्कर हे कुटुंबासह शिव कॉलनी येथे वास्तव्यास आहेत. हातमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २ मार्च रोजी नातेवाइकांकडे ते काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून गेले होते. बंद घर असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला. कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले १० हजार रुपयांची रोकड लंपास केली. गुरुवारी चंद्रकांत बाविस्कर हे गावाहून परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. घरात जाऊन पाहिले असता कपाटातील रक्कम दिसून आली नाही. चंद्रकांत बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उषा सोनवणे करीत आहे.

 

Web Title: Thieves in a closed house in Shiv Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.