जळगाव शहरातील अयोध्या नगर, खेडी परिसरात मंगळवारी पाणी पुरवठा नाही
By सुनील पाटील | Updated: April 17, 2023 20:27 IST2023-04-17T20:26:52+5:302023-04-17T20:27:14+5:30
पाईपलाईनचे काम : अनेक कॉलनीत एक दिवस पुढे ढकलला

जळगाव शहरातील अयोध्या नगर, खेडी परिसरात मंगळवारी पाणी पुरवठा नाही
जळगाव : अयोध्या नगरातील शांती निकेतन हौसिंग सोसायटीतील पाण्याची टाकी भरण्याची पाईपलाईन मुख्य जलवाहिनीला जोडण्याचे काम हाती घेण्यात आल्याने अयोध्या नगर व खेडी परिसरात मंगळवार दि.१८ एप्रिल रोजी पाणी पुरवठा होणार नाही. या भागाचा पाणी पुरवठा १९ एप्रिल रोजी होईल. या भागात अमृत पाणी योजनेची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे.
पाईप लाईन जोडणीमुळे बहुतांश भागातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. नव्या नियोजनानुसार, १९ एप्रिल रोजी योगेश्वर नगर, हिरा पाईप, शंकरराव नगर, खेडी गाव व परिसर, गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हौसिंग सोसायटी, शांती निकेतन हौसिंग सोसायटी, रौनक कॉलनी, कौतिक नगरचा संपूर्ण परिसर, अपना घर कॉलनी भाग १ व २ या भागात तर २० एप्रिल रोजी सदगुरु नगर, हनुमान नगर, लिला पार्क व गौरव हॉटेल परिसरात पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता संजय नेमाडे यांनी कळविले आहे.