देवळाली-दानापूर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 17:13 IST2020-08-07T17:10:32+5:302020-08-07T17:13:45+5:30

देवळाली-दानापूर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

Theft session continues in Bodwad | देवळाली-दानापूर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ

देवळाली-दानापूर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ

भुसावळ : देवळाली-दानापूर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. देवळाली येथे शुक्रवारी हा कार्यक्रम झाला.
रेल्वेमंत्री, वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कृषी तथा किसान कल्याणमंत्री पुरुषोत्तम रुपाला, महाराष्टÑातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, डॉ.भारती पवार यांच्यासह आमदार सरोज अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल, भुसावल मंडलचे मंडल रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता, देवळाली स्टेशन येथे अपर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा, वरिष्ट मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, वरिष्ट मंडल परिचालन प्रबंधक आर.के.शर्मा आणि सर्व शाखेचे अधिकारी (व्हिडिओ लिंकद्वारे ) उपस्थित होते.

 

Web Title: Theft session continues in Bodwad