बंद घरातून सव्वा लाखाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:19 AM2018-12-11T01:19:40+5:302018-12-11T01:22:01+5:30

भडगाव तालुक्यातील वडगाव बुद्रूक सतीचे येथील घटना एका रहिवाशाच्या बंद घरातून सव्वा लाखाच्या ऐवजाची चोरी करण्यात आल्याची घटना घडली आह.

 Theft of Lava from a closed house | बंद घरातून सव्वा लाखाची चोरी

बंद घरातून सव्वा लाखाची चोरी

Next
ठळक मुद्देनागरीकात भितीचे वातावरण अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल

भडगाव : तालुक्यातील वङगाव बुद्रूक (सतीचे) येथील बंद घरातून सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम अशा एकुण १ लाख २० हजारांच्या ऐवजाची चोरी झाल्याची घटना रविवारी रात्री घङली. भडगाव पो. स्टे. ला अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रानुसार, ही घटना ९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घङली. रामसिंग दगडू पाटील यांच्या बंद घराचा दरवाजा उघडून अज्ञात चोरटयांनी घरातील कपाटातून सोन्याची मंगलपोत, साखळ्या, बाळया, तसेच चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम असा एकुण १ लाख २० हजाराचा ऐवज चोरून नेला आहे.
याबाबत भङगाव पोलीस स्टेशनला रामसिंग पाटील रा. वङगाव बुद्रूक सतीचे, यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या या घटनेने नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे हे करीत आहेत.

Web Title:  Theft of Lava from a closed house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :theftचोरी