चाळीसगाव तालुक्यातील आडगाव शिवारातून बैलजोडीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 16:50 IST2019-10-23T16:48:01+5:302019-10-23T16:50:34+5:30
शिरसगाव येथील शेतकरी मोहन भीमराव शिंदे यांची आडगाव शिवारातील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेली बैलजोडी अज्ञात इसमांनी चोरून नेली.

चाळीसगाव तालुक्यातील आडगाव शिवारातून बैलजोडीची चोरी
आडगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या शिरसगाव येथील शेतकरी मोहन भीमराव शिंदे यांची आडगाव शिवारातील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेली बैलजोडी अज्ञात इसमांनी चोरून नेली. ही घटना २३ रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकाराने पशुपालक शेतकऱ्यांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. मेहुणबारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
शिरसगाव येथिल शेतकरी मोहन शिंदे यांची आडगाव शिवारात आडगाव/शिरसगाव रस्त्याला लागून शेती आहे. या रस्त्याला लागूनच त्यांनी बैलांसाठी पत्र्याचे शेड तयार केलेले होते. नेहमीप्रमाणे दि.२२ रोजी सायंकाळी चारा टाकून घराकडे परतले. दुसºया दिवशी म्हणजे २३ रोजी सकाळी बैल बांधत असलेला परिसर स्वच्छ करण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना शेडमध्ये बैलजोडी दिसली नाही. शेतासह इतरत्र पाहिले असता कुठेही बैलजोडी दिसली नाही .
पाटचारी क्रमांक दहाजवळ रस्त्यावर त्यांना चारचाकी गाडीच्या टायरचे निशाणे उमटलेले दिसले. यावरून त्यांच्या लक्षात आले की, आपली बैलजोडी चोरीला गेली म्हणून गावात सांगितले असता सर्वांना आचर्श्चाचा धक्का बसला. या शेतकºयाने मेहुणबारे पोलीस ठाण्यात बैलचोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावून त्यांना कडक शासन करावे, अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांकडून होत आहे.